शेतमाल तारण योजना

महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या शेतमालावर शेतमाल तारण योजना बाजार समीती व पणन महासंघामार्फत शेतक-यांसाठी लागू केली असून बाजार समीतीने संचालक मंडळ सभा दिनांक १८.११.२०१९ ठराव क्रमांक ५ नूसार विषय घेतलेला आहे. सदर बाबी कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांचे पत्र क्रमांक कृपमं/बास/शेताकयो/१९-२०/अंमलबजावणी/१७८६/२०१९ दिनांक ५.९.२०१९ नुसार बाजार समिीतीस कळविलेले आहे. तसेच परिपत्रक क्रमांक कृपमं/बास/शेताकयो/अग्रीम/२०१९-२०/२१११/२०१९ दिनांक ०४.१०.२०१९ बाबत अग्रीमाबाबत नमूद आहे. सदर पत्राची नोंद संचालक मंडळ सभेत घेण्यात आली आंहे. रुपये ५.०० लाख अग्रीम मागणी पणन मंडळाकडे करण्याचे ठरले. शेतक-यांची मागणी नाही असे ठरावात नमूद केलेले आहे. त्यामुळे सदर योजना राबविण्यात आलेली नाही. मात्र याबाबत कार्यक्षेत्रातील गावामध्ये योग्य प्रचार प्रसिध्दी करुन शेतमाल तारण योजना राबवून यशस्वी करण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.